महाराष्ट्र ही एक पुण्यभूमी आहे .भक्तीची अनोखी परंपरा या मातीला आहे . त्यामुळेच आषाढी कार्तिकीला पंढरीला जाणारे पावले तितक्याच ओढीने जेजुरीचीही वाट चालतात . पांडुरंगाचा बुका माथ्यावर लावणारे भक्त खंडेरायाचा भंडार देखील भक्तिभावाने माथी लावतात . खंडेराय हे महाराष्ट्राच्या घराघरात व मनामनात वसलेले दैवत आहे . जेजुरी हे खंडेरायाचे जगप्रसिध्द स्थान आहे . याच मल्हारी मार्तंडाचे एक जागृत देवस्थान म्हणजेच रत्नगड. हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात शिंदवड या गावातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. पंचक्रोशीत प्रतिजेजुरी म्हणूनच या तीर्थाची ओळख आहे .
रत्नगड येथील खंडेराय हे एक जागृत दैवत आहे .येथील विशेष बाब म्हणजे मंदिरात खंडेरायासोबत केवळ म्हाळसामातेची मूर्ती नसून बाणाईचीही मूर्ती आहे . जगाच्या पाठीवर ही दुर्मिळ गोष्ट आहे . मूर्ती या स्वयंभू असल्याचे जाणकार सांगतात कारण त्यांची स्थापना कुणी केली हे आजवर कुणीही सांगू शकलेले नाही . येथील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे
<शिंदवड गावातील भाविक कधीच जेजुरीला जात नाहीत