तळीभंडार हा कुलाचारातील महत्वाचा कुळाचार मानला जातो . विवाह ,चंपाषष्टी ,दसरा ,जागरण इत्यादी प्रसंगी तळीभंडार केला जातो . त्याला तळी भरणे असेही म्हणतात . खंडेरायाने मणि -मल्लासुराचा वध केला या गोष्टीचा ऋषीमुनींना अतिशय आनंद झाला . त्या आनंदात त्यांनी मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला . त्याचे प्रतिक म्हणून हा विधी केला जातो . मंदिरात असणाऱ्या कासवावर हा विधी करतात . खोबऱ्याच्या रूपाने दु:ख उधळून देत देवाकडे आनंद मागितला जातो . खोबऱ्याचे एका तुकड्यापासून दुसरे तुकडे बनते तसेच आपलीही वंशवृद्धी होत जावी . अशी त्यामागे भावना असावी . तांब्याच्या ताम्हणात विड्याची पाने ,भंडार ,खोबऱ्याचे तुकडे ,सुपारी ,टाक इ . ठेवले जातात . ताम्हणाभोवती गोलाकार पाच पुरुष बसतात . व ताट वर उचलतात पुन्हा खाली ठेवतात . तीनदा ताट उचलून झाल्यावर एकजण आपल्या डोक्यावरील टोपी किंवा वस्त्र ताटाखाली ठेवतात . पुन्हा दोनदा ताट वरखाली केले जाते . व खोबरे भंडार उधळतात . तळी भरताना पुढील प्रमाणे देवाचा जयजयकार करतात .
हरहर महादेव........ चिंतामणी मोरया ............
आनंदीचा उदे उदे ......भैरोबाचा चांगभले .....
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ........
येळकोट येळकोट जयमल्हार .......
अगडधूम नगारा ........सोन्याची जेजुरी .........
देव आले जेजुरा..........निळा घोडा ...........
पायात तोडा ........कमरी करगोटा .........
बेंबी हिरा ........मस्तकी तुरा .......
अंगावर शाल .......सदाही लाल .......
आरती करी ........म्हाळसा सुंदरी .......
देव ओवाळी नानापरी.......
खोब-याचा कुटका ........भंडारचा भडका ...........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट .........
येळकोट येळकोट जयमल्हार........
अडकेल ते भडकेल .......भडकेल तो भंडार ........
बोल बोल हजारी ...वाघ्या मुरुळी ....
खंडोबा भगत प्रणाम प्रणाम.........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट........
हरहर महादेव........ चिंतामणी मोरया ............
आनंदीचा उदे उदे ......भैरोबाचा चांगभले .....
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ........
येळकोट येळकोट जयमल्हार .......
अगडधूम नगारा ........सोन्याची जेजुरी .........
देव आले जेजुरा..........निळा घोडा ...........
पायात तोडा ........कमरी करगोटा .........
बेंबी हिरा ........मस्तकी तुरा .......
अंगावर शाल .......सदाही लाल .......
आरती करी ........म्हाळसा सुंदरी .......
देव ओवाळी नानापरी.......
खोब-याचा कुटका ........भंडारचा भडका ...........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट .........
येळकोट येळकोट जयमल्हार........
अडकेल ते भडकेल .......भडकेल तो भंडार ........
बोल बोल हजारी ...वाघ्या मुरुळी ....
खंडोबा भगत प्रणाम प्रणाम.........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट........
येळकोट येळकोट जयमल्हार........