या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत........ WELCOME TO RATNGAD DEVSTHAN SHINDWAD

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे . .

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे . . . . . . . 
रत्नगडाच्या पायथ्याशी महाराष्ट्र राज्य शतकोटी वृक्ष योजना राबविण्यात आली आहे . रत्नगड मल्हारी मार्तंड सेवेकरी यांच्या पुढाकाराने व समस्त शिंदवड ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध प्रकारचे वृक्ष या ठिकाणी लावण्यात आले . नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा . श्री . सुकदेव बनकर साहेब  तसेच दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा .श्री . राहुल रोकडे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला .  गडाच्या सभोतालची जमीन  ही खडकाळ माळरानाची आहे त्यामुळे लावलेली झाडे जगवणे हे एक मोठे आव्हान होते परंतु सेवेकऱ्यांची  जिद्द आणि खंडेरायाची कृपादृष्टी यामुळे झाडे बहरू लागली आहेत . दुष्काळाचे सावट असतानाही वृक्षारोपणाचा धाडसी निर्णय घेण्यात आला व तो यशस्वी करून दाखवण्यात आला .