रत्नगडाचे खंडेराय हे शिंदवड गावाचे ग्राम दैवत आहे . गावातील लोकांची देवावर अत्यंत श्रद्धा आहे . त्यामुळेच प्रत्येक कुटुंबातील कुटुंबप्रमुख दर रविवारी खंडेरायाचा उपवास करतो . गावात असे एकही घर नाही ज्या घरी रविवार हा उपवास केला जात नाही . रोज रात्री बारा वाजता देव गावाच्या शिवेभोवती फेरी मारतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे . जुने जाणते सांगतात की पांढऱ्याशुभ्र घोडयावर बसलेला एक तेजस्वी माणूस दररोज मध्यरात्री गावाभोवती फेरी मारतो . परंतु त्याचे दर्शन ही अत्यंत दुर्मिळ व पुण्यदायी गोष्ट आहे . अशा रीतीने खंडेराय गावचे रक्षण करतो .