श्वान
बळीराजाच्या महालामध्ये श्रीविष्णूनी दिलेल्या
वचनाला जागून द्वारपाल
म्हणून काम करीत असताना
सामवेदाने त्यांची कुत्सितपणे चेष्टा केली असता त्याला श्वान होऊन भुंकत राहण्याचा शाप दिला व मार्तंड श्रीविष्णूनी भैरव अवतारामध्ये उद्धार होईल असा उशाप दिला, अशी कथा मार्तंड विजय ग्रंथामध्ये आहे. तर बाळकृष्णाने देव्हा-यातील खंडोबा देवाला नैवेद्य
दाखविण्यापूर्वी खाल्ल्याने देवाने आपली माया दाखवीत त्याचे
कुत्र्यामध्ये रुपांतर केल्याची लोककथा प्रसिद्ध आहे.खंडोबा
उपसकांमध्ये घोड्याबरोबरच श्वानसुद्धा वाहन असल्याची भावना आहे त्यामुळे खंडोबाच्या मूर्तीबरोबर त्याला स्थान असते. घोडा किंवा कुत्रा स्वप्नामध्ये आल्यास मल्हारी
मार्तंडाचा दृष्टांत झाला असे भाविक मानतात.