या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत........ WELCOME TO RATNGAD DEVSTHAN SHINDWAD

अश्व



                     अश्व 
 
 महादेवाचे वाहन नंदी आहे पण खंडोबा अवतारात मणि मल्लासूर युद्धामध्ये मार्तंड भैरवाने नंदी ऐवजी अश्व वाहन स्वीकारले . चंद्राने अश्वरूप धारण केले. व तो खंडोबाचे वाहन बनला . या अश्वाने खंडोबा परिवारात महत्वाचे स्थान मिळवले आहे त्यामुळे मल्हारभक्तांच्या देवघरा मध्येही याला स्थान मिळाले आहे.
घोडा हे शक्तीचे प्रतिक असल्याने घरातील आजार किंवा संकट नाहीसे होण्यासाठी देवाला घोड्याची प्रतिमा अर्पण केल्यास सर्व संकटे  दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच अनेक भाविक नवस म्हणून घोड्याच्या चांदीच्या प्रतिकृती रत्नगडच्या खंडोबाच्या चरणी अर्पण करतात .