रत्नगड हे देवस्थान शिंदवड या गावाच्या आग्नेय दिशेला आहे . देवस्थानापर्यंत पोहचण्यासाठी तीन मार्ग आहेत . पहिला मार्ग शिंदवडगावातून जातो . मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पिंपळगाव बसवंत या गावाहून सप्तशृंगी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या वणी या गावी जाणाऱ्या राज्यमार्ग क्र . ३६० या मार्गावर खेडगाव फाटा लागतो . तेथून आपण खेडगावात येवू शकतो . खेडगावच्या पूर्वस ३ किमी अंतरावर शिंदवड हे गाव आहे . आपण बसने प्रवास करणार असाल तर दररोज सकाळी १०. ३० वा खेडगावहून शिंदवडला जाणारी बस असते . तसेच दुपारी २. ३० वा वडाळीभोई ते शिंदवड बस आहे .
दुसरा मार्ग मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या वडाळीभोई येथून आपण वडनेर भैरव येथे येऊ शकता . वडनेर भैरवच्या पश्चिमेस ३ किमी अंतरावर रत्नगड आहे .
१ नाशिक --पिंपळगाव बसवंत----खेडगाव -----शिंदवड-----रत्नगड
२ चांदवड ------वडाळीभोई-----वडनेर भैरव----रत्नगड
३ वणी ----खेडगाव -----शिंदवड-----रत्नगड
४. दिंडोरी ----लखमापूर फाटा ----कादवा कारखाना ----खेडगाव -----शिंदवड-----रत्नगड